आपला डेटा

आमची इच्छा आहे कि आम्ही कोणता डेटा संकलित करतो आणि वापरतो ते आपण समजावून घ्यावे.

आपण Google सेवा वापरता तेव्‍हा, आपल्‍या माहितीच्या बाबतीत आपण आमच्यावर विश्वास ठेवता. आपल्यासाठी आमच्या सेवा अधिक चांगल्या बनवण्यासाठी आम्ही काय संकलित करतो आणि ते आम्ही कसे वापरतो याबद्दल स्पष्ट असणे ही आमची जबाबदारी आहे.

आम्‍ही या तीन मुख्‍य प्रकाराची माहिती संकलित करतो:

आपण करता त्या गोष्‍टी

आपण आमच्या सेवा वापरता तेव्हा – उदाहरणार्थ, Google वर शोध घेताना, Google नकाशे वर दिशानिर्देश मिळवताना किंवा YouTube वर व्हिडिओ पाहताना – या सेवांनी आपल्यासाठी कार्य करण्यासाठी आम्ही डेटा संकलित करतो. यात हे समाविष्ट असू शकते:

 • आपण शोधता त्या गोष्टी
 • आपण भेट देता त्या वेबसाइट
 • आपण पाहता ते व्हिडिओ
 • आपण क्लिक किंवा टॅप करता त्या जाहिराती
 • आपले स्थान
 • डिव्हाइस माहिती
 • IP पत्ता आणि कुकी डेटा

आपण तयार करता त्या गोष्‍टी

आपण आपल्‍या Google खात्यासह साइन इन केल्यास, आमच्या सेवा वापरून आपण जे तयार करता ते आम्‍ही संचयित आणि सुरक्षित करतो. यात हे समाविष्ट असू शकते:

 • आपण Gmail वरून पाठविता किंवा त्यावर प्राप्त करता ते ईमेल
 • आपण जोडता ते संपर्क
 • कॅलेंडर इव्हेंट
 • आपण अपलोड करता ते फोटो आणि व्हिडिओ
 • ड्राइव्हवरील दस्तऐवज, पत्रक आणि स्लाइड

आपल्याला “आपण” बनवितात त्या गोष्‍टी

आपण Google खात्यासाठी साइन अप करता तेव्हा, आपण आम्हाला देता ती मूलभूत माहिती आम्‍ही ठेवतो. यामध्‍ये आपल्‍या या माहितीचा समावेश असू शकतो:

 • नाव
 • ईमेल पत्ता आणि संकेतशब्द
 • वाढदिवस
 • लिंग
 • फोन नंबर
 • देश
एका स्मार्टफोनवर Google नकाशे

Google नकाशे आपले स्थान जलद कसे मिळवतो

आपण Google नकाशे अॅपचा वापर करता, तेव्हा आपला फोन आपल्या स्थानाविषयी अनामित डेटा बिट परत Google कडे पाठवतो. हा रहदारी नमुना ओळखण्यासाठी आपल्या जवळपासच्या लोकांकडील डेटासह एकत्रित केला जातो. उदाहरणार्थ, बरीच वाहने एकाच रस्त्यावरून धीम्या गतीने जात असताना नकाशे शोधू शकतो आणि आपल्याला खूप रहदारी आहे हे सांगू शकतो. म्हणून पुढटच्या वेेळी नकाशे अपघाताबद्दल चेतावणी देतात आणि आपल्याला वेगवान मार्गावर जाण्यास मार्गदर्शन करतात, तेव्हा शॉर्टकटसाठी आपल्यासारख्या ड्रायव्हरने दिलेल्या डेटाबद्दल त्यांचे आभार माना.

स्वयंभरणासह Google शोध बार

आपले शोध Google कसे स्वयंपूर्ण करते

आपल्‍याला माहित आहे आपण काहीतरी शोधताना चुकीचा शब्द टाइप करता तेव्‍हा — आपल्‍याला काय म्हणायचे आहे ते Google कसे जाणून घेते? आमचे शब्दलेखन सुधारणा मॉडेल आपल्यासाठी ते दुरूस्त करण्यासाठी यापूर्वी समान चूक केलेल्या लोकांकडील डेटा वापरते. अशा प्रकारे आम्हाला कळते की आपण “Barsalona,” टाईप करता तेव्हा आपल्याला बहुदा हवे आहे “Barcelona.”

आपला शोध इतिहास देखील Google ला आपले शोध स्वयंपूर्ण करण्यात मदत करू शकतो. उदाहरणार्थ, आपण “बार्सिलोना फ्‍लाइट” साठी यापूर्वी शोध केल्‍यास, आपण टाइप करणे समाप्त करण्‍यापूर्वीच आम्‍ही हे शोध बॉक्समध्‍ये सुचवू शकतो. किंवा आपण फुटबॉल क्लबचे चाहते असल्‍यास आणि अनेकदा “बार्सिलोना गुण,” शोधत असल्यास आम्ही लगेच ते सुचवू शकतो.

स्वयंभरणाद्वारे पूर्ण केलेल्या फॉर्मसह Chrome टॅब

Chrome आपल्यासाठी फॉर्म कसे पूर्ण करते

प्रत्येक वेळी आपण खरेदी करताना किंवा ऑनलाइन खात्यासाठी साइन अप करता, तेव्हा आपण वैयक्तिक महिती फॉर्ममध्ये भरण्यासाठी वेळ खर्च करता. आपण Chrome वापरता, तेव्हा आम्ही आपले नाव, पत्ता, फोन नंबर , ईमेल पत्ता, आणि देयक माहिती यासारख्या गोष्टी जतन करून ठेवू शकतो जेणेकरून आम्ही आपल्यासाठी हे फॉर्म स्वयंपूर्ण करू शकतो. आपण नेहमी विशिष्ट स्वयं-भरण फील्ड संपादित किंवा पूर्णपणे हे सेंटिग अक्षम करू शकता.

प्रोफाइल फोटो आणि खाजगी परिणाम बटणासह Google शोध बार

आपली स्वतःची माहिती शोधण्यात Google शोध आपली कशी मदत करते

Google शोध Gmail, Google फोटो, कॅलेंंडर, आणि अधिक मधील उपयुक्त माहिती आणू शकते, आणि ते आपल्या खाजगी शोध परिणांमामध्ये दाखवू शकते म्हणून आपल्याला स्वतः शोध घ्यावा लागत नाही. "माझ्या दंतवैद्याची नियोजित भेट ," "मला बीच येथील माझे फोटो दाखवा," किंवा "माझ्या हॉटेल आरक्षण कोठे आहे" यासारख्या गोष्टी शोधा. आपण साइन इन आहात, तोपर्यत आम्ही अन्य Google सेवामधून ही माहिती काढतो आणि ती तुम्हाला फक्त एका चरणामध्ये देतो.

वापरकर्ता आणि Google सहाय्यकादरम्यान चॅट फुगे

आपला Google सहाय्यक आपल्याला कार्य पूर्ण करण्‍यात कशी मदत करू शकतो

आपण घरी असताना किंवा जाताजाता, आपला सहाय्यक नेहमी मदत करण्यासाठी सज्ज असतो. आपल्या सहाय्यकास आपण प्रश्न विचारता किंवा त्यास काय करायचे आहे ते सांगता तेव्हा, आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला देण्यासाठी तो अन्य Google सेवांमधील डेटा वापरतो. उदाहरणार्थ, “जवळपास कॉफीची दुकाने कोणती आहेत?” किंवा “मला उद्या छत्रीची आवश्‍यकता असेल काय?” असे आपण विचारल्यास आपल्याला सर्वाधिक संबद्ध उत्तर देण्‍यासाठी आपला सहाय्यक नकाशे आणि शोध मधील तसेच आपले स्थान, स्वारस्ये आणि प्राधान्यांमधील माहिती वापरतो. आपल्या सहाय्यकाशी केलेल्या परस्पसंवादांंमधून संकलित केलेला डेटा पाहण्यासाठी किंवा हटविण्‍यासाठी आपण नेहमी माझा क्रियाकलाप साधनावर भेट देऊ शकता.

आपल्‍या Google अनुभवावर नियंत्रण मिळवा

येथे आपली गोपनीयता व्यवस्थापित करण्यासाठी आपण कधीही वापरू शकाल अशी काही साधने आहेत.

माझे खाते सह ब्राउझर प्रदर्शित

माझे खाते येथे आपली गोपनीयता सेटिंग्ज नियंत्रित करा

आपल्‍याकडे Google खाते असले किंवा नसले तरीही, कोणत्या प्रकारची माहिती Google सेवांना आपल्‍यासाठी अधिक चांगले कार्य करू देऊ शकते ते आपण निश्चित करा. माझे खाते आपली वैयक्तिक माहिती व्यवस्थापित करण्यास आणि गोपनीयता संरक्षित करण्यात मदत करणाऱ्या साधनांमध्ये द्रुत प्रवेश देते.

Chrome विंडो मध्ये मागील शोध

माझा क्रियाकलाप येेथे आपल्या खात्यामध्ये कोणता डेटा आहे ते पहा

माझा क्रियाकलाप ही एक मध्यवर्ती जागा आहे जिथे आपण आमच्या सेवांचा वापर करून जे सर्वकाही शोधता, किती वेळा पाहता आणि पाहिले ते मिळवू शकता. आपला मागील ऑनलाइन क्रियाकलाप आठवण्यास ते सोपे करते, आम्ही विषय, दिनांक आणि उत्पादनांनुसार शोध घेण्यास साधने देतो. आपण आपल्या खात्यासह संबंधित ठेवू इच्छित नाही अशा विशिष्ट गतिविधी किंवा संपूर्ण विषय कायमचा हटवू शकता.

Chrome गुप्त चिन्ह

गुप्त मोडमध्ये खाजगी रूपात वेब ब्राउझ करा

आपला वेब इतिहास आपल्या शोध इतिहासाला अधिक उपयुक्त बनविण्यास मदत करू शकतो, मात्र असे काही प्रसंग असतात जेव्हा तुम्ही गुप्तपणे ब्राउझ करू इच्छिता. उदाहरणार्थ, आपला संगणक आपल्या प्रियासोबत सामायिक केला असल्यास, आपण शोधत असलेल्या सरप्राइझ बर्थडे गिफ्टची मजा आपल्या ब्राउझिंग इतिहासामुळे नाहिशी होणे आवडणार नाही. यासारख्या क्षणासाठी, Google Chrome ला आपला ब्राउझिंग इतिहास जतन करून ठेवण्यापासून रोखण्यासाठी आपल्या संगणकावर किंवा मोबाइल डिव्हाइसवर एक गुप्त विंडो उघडा.