सुरक्षित इंटरनेट

आम्ही प्रत्‍येकासाठी इंटरनेट अधिक सुरक्षित बनविण्यास मदत करतो.

आमचा सुरक्षितता तंत्रज्ञान विकसित करण्याचा इतिहास खूप जुना आहे जो फक्त आमच्याच वापरकर्त्यांसाठी नाही तर संपूर्ण ऑनलाइन जगासाठी फायदेशीर आहे. आमच्या सेवांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान बनवितो तेव्हा ते सर्वांच्या फायद्यासाठी सामायिक करण्याची आम्हाला संधी मिळते. आणि धोके वेळोवेळी बदलतात, आमचे अनुकूलित, भविष्याकडे पाहणारे उपाय दुसऱ्या कंपनीसाठी अनुसरण करण्याचा मार्ग तयार करतात.

सुरक्षित ब्राउझिंग फक्त Chrome वापरकर्त्यापेक्षा अधिक लोकांना संरक्षित करते

आम्ही मूलतः आमचे सुरक्षित ब्राउझिंग तंत्रज्ञान Chrome वापरकर्त्यांना ते जेव्हा धोकादायक वेबसाइटसना भेट देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मालवेअर आणि फिशिंग प्रयत्नापासून त्यांना सतर्क करून संरक्षित करण्यासाठी निर्माण केले होते. प्रत्येकासाठी इंटरनेटला सुरक्षित करण्यास, आम्ही या तंत्रज्ञानाला इतर कंपन्यांसाठी, Apple Safari आणि Mozilla Firefox सह, त्यांच्या ब्राउझरमध्ये वापरण्यासाठी मोफत केले. आज, जगाची अर्धी लोकसंख्या सुरक्षित ब्राउझिंग द्वारे संरक्षित आहे.

आम्ही वेबसाईट मालकांना त्यांच्या साईटमध्ये सुरक्षा उणिवा असतात तेव्हा सूचना देतो आणि समस्यांचे द्रुतपणे निराकरण करण्यासाठी मदत म्हणून मोफत साधने देऊ करतो. आम्ही नवीन सुरक्षितता तंत्रज्ञान जसे विकसित करतो तसे ते सामायिक करून, आम्ही सर्वांसाठी सुरक्षित असे इंटरनेट निर्माण करण्यास मदत करतो.

आपण इंटरनेट ब्राउझ करताना आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही HTTPS चा वापर करतो

आम्ही आपल्याला फक्त काय आणि कोठे हवे तेच मिळावे याची खात्री करण्यास आपल्याला टेहाळणी करणाऱ्या डोळ्यांपासून आणि दुर्भावनायुक्त हॅकर्सपासून संरक्षित करण्यास आमच्या सेवांना HTTPS कूटबद्धीकरण च्या मार्फत कनेक्ट करतो. ही अतिरिक्त सुरक्षा स्वीकारण्यास वेबसाइटना प्रोत्साहित करण्यास, आम्ही आमच्या शोध परिणामामध्ये वेबसाईटना रॅकिंग करताना Google शोघ अल्गोरिदम जे सिग्नलना वापरतो त्याच्यापैकी एक आम्ही HTTPS कूटबद्धीकरण केले आहे.

आम्ही भेद्यता उघड्या करण्यास सुरक्षितता बक्षिसे तयार करतो

Google येथे आम्ही सुरक्षितता बक्षिस कार्यक्रम तयार करतो जे स्वतंत्र संशोधकांना आमच्या सेवांमध्ये भेद्यता शोधण्यास आणि सुरक्षितता निराकरण तयार करण्यास देय देतात. प्रत्येक वर्षी आम्ही संशोधन अनुदान आणि बग अधिदान यासाठी करोडो डॉलर्सना देऊ करतो. आम्ही सध्या अनेक Google उत्पादने, जसे Chrome आणि Android यांच्यासाठी सुरक्षितता पुरस्कार कार्यक्रमांचा वापर करतो.

आम्ही आमची सुरक्षितता साधने विकासकांसाठी उपलब्ध करतो

आम्ही आमचे सुरक्षितता तंत्रज्ञान तेव्हा सामायिक करतो जेव्हा आम्हाला विश्वास असतो की याने इतरांना लाभ होऊ शकतो. उदाहरणार्थ, आमची Google मेघ सुरक्षितता स्कॅनर विकासकांना मोफत उपलब्ध आहे ज्यामुळे ते अॅप इंजिनमध्ये त्यांच्या वेब अनुप्रयोगांना सुरक्षितता भेद्यतेसाठी स्कॅन आणि विश्लेषित करू शकतात.

आम्ही सुरक्षित इंटरनेटची जोपासना करण्यास आमच्या पद्धतीबद्दल डेटा सामायिक करतो

2010 पासून Google ने पारदर्शकता अहवाल प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये कॉपीराईट काढणे, शासनाच्या वापरकर्ता डेटासाठीच्या विनंत्या, आणि सुरक्षित ब्राउझिंग सारख्या सुरक्षितता पुढाकार यासारख्या गोष्टींबद्दल आकडेवारी आहेत. आम्ही वेबसाईट आणि ईमेल यांच्यासाठी उद्योगांचे कूटबद्धीकरणाची स्वीकृती वर डेटा देखील सामायिक करतो. आम्ही फक्त आमची प्रगती सामायिक करण्यास हे करत नाही, मात्र सर्वांसाठी सुरक्षित इंटरनेट या स्वारस्यासाठी इतरांनी बळकट सुरक्षा मानकांना स्वीकारावे यासाठी प्रोत्साहित करतो.