जाहिराती कशा कार्य करतात

आम्ही आपल्या वैयक्तिक माहितीची विक्री करत नाही.

आमचा बराचसा व्यवसाय Google सेवा आणि आमच्यासह भागीदार असलेल्या वेबसाइट आणि मोबाइल अॅप्स या दोन्हीवर, जाहिराती दाखविणे यावर आधारित आहे. जाहिराती प्रत्येकासाठी आमच्या सेवा मोफत ठेवण्यास मदत करतात. आम्ही हा डेटा आपल्याला या जाहिराती दाखविण्यासाठी वापरतो, परंतु आम्ही आपले नाव, ईमेल पत्ता, आणि देयक माहिती यासारखी वैयक्तिक माहिती विकत नाही.

आम्ही जाहिरातीना संबद्ध बनविण्यासाठी डेटाचा वापर करतो

आम्ही आपल्या डिव्हाइसेस वरून संकलित केलेला डेटा, आपले शोध आणि स्थाने, आपण वापरलेल्या वेबसाइट आणि अॅप्स, आपण पाहिलेले व्हिडिओ आणि जाहिराती, आणि वैयक्तिक माहिती जी आपण आम्हाला दिली आहे, जसे आपले वय, लिंग, आणि स्वारस्याचे विषय यांचा वापर करून आपल्याला उपयुक्त जाहिराती दाखविण्याचा प्रयत्न करतो.

आपण साइन इऩ असाल आणि आपल्या जाहिराती सेटिंग्जवर अवलंबून असाल, तर हा डेटा आपल्या डिव्हाइसेसवर आपण पाहिलेल्या जाहिरातीबद्दल माहिती देतो. आपण ऑफिसमध्ये आपल्या संगणकावर एका प्रवास वेबसाइटला भेट दिल्यास, आपल्याला नंतर त्या रात्री पॅरिसचे हवाई भाडे दाखविणारी जाहिरात आपल्या फोनवर दिसू शकते.

लोक पाहतात किंवा टॅप करतात जाहिरातदार फक्त त्या जाहिरातीसाठी देय देतात

जाहिरातदार जेव्हा आमच्या सोबत एक जाहिरात मोहिम चालवितो, तेव्हा तो आम्हाला त्या जाहिराती प्रत्यक्षात कशा चालतात याच्या आधारावर देय देतात - आपल्या वैयक्तिक माहितीच्या आधारावर कधीही नाही. यामध्ये प्रत्येक वेळी कोणीतरी जाहिरात पाहतो किंवा टॅप करतो, किंवा जाहिरात पाहिल्यावर कार्य करतो, जसे एक अॅप डाउनलोड करून, किंवा एक विनंती फॉर्म भरतो याचा समावेश असू शकतो.

आम्ही जाहिरातदाराला त्याची मोहिम कशी चांगल्या प्रकारे चालली ते दाखवितो

आम्ही जाहिरातदारांना त्यांच्या जाहिरातीच्या कार्यप्रदर्शनाविषयीचा डेटा देतो. परंतु आपली कोणतिही वैयक्तिक माहिती उघड न करता आम्ही तसे करतो. आपल्याला जाहिरात दाखविण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्पयावर, आम्ही आपली वैयक्तिक माहिती संरक्षित आणि खाजगी ठेवतो.

Google सेवा आणि भागिदार साइट वर जाहिराती कशा कार्य करतात

आपल्याला उपयुक्त अशा जाहिराती दाखविण्यास आम्ही डेटा वापरतो, जरी तो Google सेवा किंवा आमच्यासह भागिदार आहेत त्या वेबसाईट आणि मोबाइल अॅप वर असला तरीही.

ब्राउझर विंडोमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या बाईक

शोध जाहिराती कशा कार्य करतात

आपण Google शोध वापरता, तेव्हा जाहिराती संबद्ध शोध परिणामांच्यापुढे किंवा वर आढळतील. बहुतेक वेळा. या जाहिराती आपण आता केलेले शोध आणि आपले स्थान याद्वारे आपल्याला दाखविल्या जातात. उदाहरणार्थ, “बाइक,” साठी शोध घेतला असल्यास, आपल्याला जवळील सायकल विक्रीवरील सेलच्या जाहिराती दिसू शकतील.

इतर प्रकरणांमध्ये, सर्वात उपयुक्त जाहिराती देण्यास मदत करण्यासाठी आम्ही आपले मागील शोध किंवा आपण भेट दिलेल्या साइट यासारखा अतिरिक्त डेटा वापरतो. आपण आधीच “बाइक,” साठी शोध घेतला असल्याने, जर आपण “सुट्ट्या,” साठी शोध घेतल्यास आपल्याला सुट्टीवर असताना बाइकवर जायच्या ठिकाणाच्या जाहिराती दिसू शकतात.

Gmail मध्ये पिवळ्या रंगाने ठळक केलेल्या Google जाहिराती

YouTube जाहिराती कशा कार्य करतात

आपण YouTube वर व्हिडिओ पाहता, तेव्हा आपण व्हिडिओ पृष्ठ प्ले होण्यापूर्वी किंवा व्हिडिओ पृष्ठावर प्ले होणाऱ्या जाहिराती पाहू शकता. या जाहिराती आपण पाहिलेल्या व्हिडिओ आणि आपल्या वर्तमान आणि अलिकडील YouTube शोध यासारख्या अन्य डेटा यांच्या आधारावर असतात.

उदाहरणार्थ, आपण “फॅशन टिपा” साठी शोध घेतला किंवा सौंदर्य-संबंधित जाहिराती पाहिल्या असल्यास, आपल्याला एका नवीन सौंदर्य मालिकेची जाहिरात पाहावयास मिळू शकते. या जाहिराती आपण पहाता त्या व्हिडिओंच्या निर्मात्यांना समर्थन करण्यात मदत करतात.

आपण YouTube जाहिराती पाहू इच्छित नसल्यास आपण अनेक YouTube जाहिराती वगळू शकता.

आनंदी स्त्रीच्या YouTube व्हिडिओमध्ये ट्रेन्डी सनग्लासेससाठी पॉप-अप जाहिरात असते

Gmail जाहिराती कशा कार्य करतात

तुम्ही Gmail मध्ये पाहत असलेल्या जाहिराती तुमच्या Google खात्याशी संबंधित डेटावर आधारित आहेत. उदाहरणार्थ, YouTube किंवा शोध यासारख्या इतर Google सेवांमधील तुमची अॅक्टिव्हिटी तुम्ही Gmail मध्ये पाहत असलेल्या जाहिरातींच्या प्रकारावर परिणाम करू शकते. जाहिराती दाखवण्यासाठी Google तुमच्या इनबॉक्समधील कीवर्ड किंवा संदेश वापरत नाही. तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी कोणीही तुमचे ईमेल वाचत नाही.

प्रोफाईल फोटोसह असलेल्या ब्राउझरमध्ये स्टायलिश हिरव्या बॅगची जाहिरात आहे

Google भागीदार साइटवर जाहिराती कशा कार्य करतात

जाहिराती दर्शविण्यासाठी अनेक जाहिराती आणि मोबाइल अॅप्स आमच्यासह भागीदार आहेत. आमच्या वापरकर्त्यांनी आमच्यासह सामायिक केलेल्या वैयक्तिक माहितीच्या आणि आपल्या ऑनलाइन क्रियाकलापाच्या बद्दल आम्ही संकलित केलेल्या डेटाच्या आधारावर हे जाहिरातदार दिलेल्या जाहिराती प्रेक्षक “प्रकारा” ला दाखविण्याचे ठरवितात: उदाहरणार्थ, “25 – 34 वयाचे पुरूष जे प्रवास करण्यास इच्छुक आहेत.”

आपण पूर्वी भेट दिलेल्या साइटच्या आधारावर देखील आम्ही आपल्याला जाहिराती दाखवू शकतो — उदाहरणार्थ, आपल्याला त्या लाल बुटांसाठी जाहिरात दिसू शकते जे आपण आपल्या ऑनलाइन खरेदी कार्टमध्ये जोडलेले परंतु खरेदी न करण्याचे ठरविले. परंतु हे आम्ही आपले नाव, इमेल पत्ता, किंवा बिलिंग माहिती उघड न करता करत असतो.

आपल्या Google जाहिरातींचा अनुभव नियंत्रित ठेवा

आपण साइन इन असला किंवा साइन आऊट असला तरी देखील आपण पाहू शकाल त्या जाहिरातीचे प्रकार नियंत्रण करण्यासाठी आम्ही आपल्याला साधने देऊ करतो.

जाहिरात सेटिंग्जसह टॅब्लेट आणि सनग्लासेससाठी जाहिरात

आपल्या प्राधान्यावर आधारित जाहिराती नियंत्रित करा

आपल्या जाहिरात सेटिंग्ज मध्ये, आपल्याला स्वारस्य असलेल्या विषयांच्या आधारावर आपण जाहिराती नियंत्रित करू शकता. उदाहरणार्थ, आपल्याला पॉप संगीत आवडते हे Google ला सांगण्यासाठी जर आपण जाहिराती वैयक्तिकरण सेटिग्ज वापरले, तर YouTube मध्ये साइन इन केल्यानंतर आपल्याला आगामी प्रकाशने आणि कार्यक्रमासाठीच्या जाहिराती दिसू शकतात.

आपण साइन इन केलेले असताना जाहिराती वैयक्तिकीकरण बंद केल्यास, आम्ही सर्व Google सेवा त्याच प्रमाणे वेबसाइट आणि अॅप्स जे आमच्यासह भागिदार आहेत त्यावरील आपल्या स्वारस्याच्या विषयांशी संबंधित जाहिराती आपल्याला दाखविणे बंद करू. आपण साइन आऊट केल्यास, जाहिराती वैयक्तिकीकरण बंद केल्याने फक्त जिथे जाहिराती दाखविल्या जातात त्या Google सेवांवर परिणाम होतात.

एका हरित कारसाठी शीर्षवर निःशब्द बटण असलेली Google जाहिरात

आपल्याला ज्या जाहिराती पाहावयाच्या नाहीत त्या काढा

आम्ही आमच्या भागीदार वेबसाइट आणि अॅप्सद्वारे दर्शवितो अशा अनेक जाहिरातींवर ही जाहिरात निःशब्द करण्याची क्षमता आपल्याला देतो. जाहिरातीच्या कोपर्‍यातील “X” निवडून, आपल्याला यापुढे संबद्ध न वाटणार्‍या जाहिराती आपण काढू शकता.

उदाहरणार्थ, आपण नवीन कार घेण्यासाठी मार्केट मध्ये गेले असताना कार जाहिराती कदाचित उपयुक्त असू शकतात, परंतु एकदा आपण आपल्या नवीन वाहनामध्ये आनंदाने फिरल्यानंतर, आपण नुकत्याच खरेदी केलेल्या कारबद्दलच्या आणखी जाहिराती किंबहुना पाहू इच्छित नसता.

आपण साइन इन असाल आणि आपल्या जाहिराती सेटिंग्जवर अवलंबून असाल, हे नियंत्रण आमच्यासह भागीदारी केलेल्या वेबसाइट आणि अॅप्स यावरील आपण साइन इन असलेल्या डिव्हाइसेना प्रभावित करेल.

Google सेवावर जाहिराती दाखविणाऱ्या या जाहिरातदाराला अवरोधित करा चा वापर करून आपण साइन इन न करता देखील जाहिराती अवरोधित करू शकता.

उजव्या शीर्षावर माहिती बटणासह सनग्लासेसची जाहिरात

आपल्याला जाहिराती दाखविण्यासाठी आम्ही कोणता डेटा वापरतो ते जाणून घ्या

आपल्‍याला जाहिराती दर्शविण्यासाठी वापरला जाणारा डेटा आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्‍यात आम्‍ही आपल्याला मदत करू इच्छितो. ही जाहिरात का हे वैशिष्ट्य आपल्याला ही जाहिरात का दाखविली जात आहे ते जाणून घेण्यास एका क्लिकच्या साहाय्याने प्रॉम्ट करण्याची परवानगी देते. उदाहरणार्थ, आपण फॅशन वेबसाइटना भेट देत असल्याने आपल्याला ड्रेससाठीची जाहिरात दिसत असेल. किंवा आपल्या स्थानाच्या ठिकाणी असल्याचा आपला शोध लागल्याने आपल्याला एका रेस्टॉरंटसाठीची जाहिरात दिसू शकते. आपल्याला उपयुक्त वाटतील अशा गोष्टीची जाहिरात दर्शविण्यासाठी अशा प्रकारचा डेटा आम्हाला मदत करतो. परंतु लक्षात ठेवा, आम्ही कधीही हा डेटा जाहिरातदारांसह सामायिक करीत नाही.